घरमुंबईकल्याणमध्ये शिवसेना- भाजप बंडखोरांचे आव्हान कायम

कल्याणमध्ये शिवसेना- भाजप बंडखोरांचे आव्हान कायम

Subscribe

मंगळवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी दोघांनीही माघार न घेतल्याने युतीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात मित्रपक्षाच्या उमेदवारांचे आव्हान उभं ठाकलं आहे.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजपाचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण पूर्व मतदारसंघातून सेनेचे धंनजय बोडारे यांनी बंडखोरी केली आहे. मंगळवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी दोघांनीही माघार न घेतल्याने युतीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात मित्रपक्षाच्या उमेदवारांचे आव्हान उभं ठाकलं आहे. कल्याणातील बंड शमविण्यात पक्ष श्रेष्ठींना यश आलं नसल्याचं दिसून येतंय.

हेही वाचा – भूमिपूत्रांना ८० टक्के नोकऱ्या देणार; महायुतीचा शपथनामा जाहीर

चौरंगी लढत पहायला मिळणार

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे आमदार नरेंद्र पवार हे निवडून आले. मात्र भाजपाच्या वाट्याला असलेला मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आल्याने भाजपा कार्यकर्ते नाराज झाले आहेत. शिवसेनेने शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र आमदार पवार यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भोईर यांना फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच येथून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आणि काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र आघाडी धर्माचे पालन करत हनुमंते यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि भाजपा बंडखोर असा चौरंगी सामना रंगणार आहे. कल्याण पूर्वेतून भाजपाने आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. मात्र उल्हासनगरमधील सेनेचे पदाधिकारी धनंजय बोडारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केली आहे. त्यांनीही माघार न घेतल्याने गायकवाड यांच्यापुढे मोठं आव्हान आहे. तसेच कल्याण ग्रामीणमधून सेनेच्या सुभाष भोईर यांचा पत्ता कापून ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने आज अखेर भोईर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे म्हात्रे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -