घरमहाराष्ट्रकाँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा शिवसेनेत प्रवेश

Subscribe

‘महाराष्ट्राचा टोकाचा जिल्हा नंदुरबार, आजपर्यंचत माझ्याकडूनही हा जिल्हा थोडासा दुर्लक्षित म्हणून राहिला होता. पण मला खात्री आहे. अक्कलकुवा सीट शिवसेना लढते आहे. नुसती लढणारच नाही शिवसेना जिंकणार देखील आहे’, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. नंदुरबारचे चंद्रकांत रघुवंशी यांनी बुधवारी दुपारी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवबंधन बांधले. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. चंद्रकांत रघुवंशी यांचे उद्धव ठाकरे यांनी पक्षात स्वागत केले. रघुवंशी यांचे पक्षात आल्याने शिवसेनेची ताकद नंदुरबारमध्ये वाढली असल्याचे ठाकरे म्हणाले. याशिवाय आपण प्रचारासाठी नंदुरबारला येणार, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले. पक्षप्रवेशानंतर आपल्याला जे काही बोलायचे आहे, ते आपण ८ ऑक्टोबरला शिवसेनेच्या दसरा मिळाव्यात बोलू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्रकांत रघुवंशी यांनी मंगळवारी संध्याकाळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याजवळ आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई देखील उपस्थित होते.

कोण आहेत चंद्रकांत रघुवंशी?

चंद्रकांत रघुवंशी हे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नाव आहे. मात्र, आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. रघुवंशी हे नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार होते. काल म्हणजे मंगळवारी संध्याकाळी त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आणि आज दुपारी मातोश्री येथे जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या २० वर्षांपासून ते काँग्रेसची धुरा सांभाळत होते. याशिवाय ते नंदुरबारमधील काँग्रेसचे एकनिष्ठ नेते होते. चंद्रकांत रघुवंशी यांचे वडील कॅबेटसिंह रघुवंशी देखील काँग्रेसमध्ये होते. ते तीन वेळा विधानपरिषदेवर निवडून आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – बाळासाहेबांनी मला शिवसैनिकांवर लादलं नाही, शिवसैनिकांनी मला स्वीकारलं – उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -