घरमहाराष्ट्रराहुल गांधी आले की सीट निवडून येईल - देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी आले की सीट निवडून येईल – देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळेगाव येथील प्रचार सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

‘राहुल गांधी आले की चांगलंच असत सीट निवडून येते. ते म्हणतात ७० वर्षांपासून अन्याय आणि भ्रष्टाचार सुरू आहे. पण त्यांना हे ही माहीत नाही की ६० वर्ष त्यांचीच सत्ता होती’, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या निशाणा साधला आहे. ते भाजप उमेदवार मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्या प्रचार सभेत तळेगाव येथे बोलत होते.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘काही लोक म्हणतात या निवडणुकीत मजाच येत नाही. पूर्वीच्या निवडणुकांमध्ये शर्यती लावायचो. हा पक्ष निवडून येईल, त्याची सत्ता येईल, तो मुख्यमंत्री होईल असं सांगायचे. मात्र, अशी अवस्था आहे की पाच वर्षांच्या शेंबड्या पोराला विचारलं की कोणतं सरकार येईल तो ही सांगतोय महायुतीच सरकार येणार आहे’, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisement -

‘मला समृद्ध महाराष्ट्र तयार करायचा आहे या समृद्ध महाराष्ट्र करिता शिवबाच्या भूमीतून या मावळातून शिवबाचा एक मावळा मला हवाय. मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की, बाळा भेगडे यांना विक्रमी मतांनी निवडून द्या. राज्यमंत्री नाही मंत्री म्हणून या ठिकाणी पाठवेल’, असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री यांनी जनतेला दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -