घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध

देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर एकेकाळी भाजपचे आमदार असलेल्या आशिष देशमुख यांनी फडणवीस यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. या प्रकरणाची आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणीनंतर हा अर्ज वैध असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. ज्या वकिलाने फडणवीस यांच्या अर्जाची नोटरी केली होती, त्यांचा नोटरीचा कालावधी वाढविण्यात आला असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उमेदवारी दाखल करण्याची शेवटची मुदत असताना आपला अर्ज भरला होता. त्यानंतर आशिष देशमुख यांनी फडणवीस यांच्या अर्जावर आक्षेत घेतला होता. अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रावर नोटरीचा शिक्का मारला गेला, त्याची मुदत संपली असल्याचा आरोप करण्यात आला होता. शपथपत्रावर नोटरीचा कालावधी २०१९ सालीच संपला असल्याचे नमूद केलेले होते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचे शपथपत्रच नियमबाह्य ठरते, असा आरोप काँग्रेसने केला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -