घरताज्या घडामोडीअखेर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर!

अखेर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर!

Subscribe

गेल्या १५ दिवसांपासून राज्यात सत्ता स्थापन झाल्यापासून मंत्र्यांना निश्चित असं खातं देण्यात आलं नव्हतं. मंत्र्यांचा शपथविधी होऊन देखील अद्याप त्यांना खातेवाटप करण्यात न आल्यामुळे विरोधकांकडून देखील टीका केली जाऊ लागली होती. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीमंडळाचा खातेवाटप करतील अशी शक्यता होती. अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आला असून त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह खात्याचा कारभार सोपवण्यात आला असून छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा अशी खाती देण्यात आली आहेत. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल आणि उर्जा खाते तर सुभाष देसाईंकडे पूर्वीचेच उद्योग आणि इतर खात्यांचा कारभार सोपवण्यात आला आहे. जयंत पाटील यांच्याकडे अर्थखातं देण्यात आलं असून नितीन करीर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.

सविस्तर खातेवाटप पुढीलप्रमाणे – 

एकनाथ शिंदे – गृह नगरविकास, वन, पर्यावरण, पाणी पुरवठा, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

- Advertisement -

छगन भुजबळ – ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, उत्पादनात शुल्क, अन्न व औषध प्रशासन, कौशल्य विकास व उद्योजकता

बाळसाहेब थोरात – महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैदकीय शिक्षण, शालेय शिक्षण आणि पशु-दुग्ध-मत्स्य

- Advertisement -

सुभाष देसाई – उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास

जयंत पाटील – वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास

नितीन राऊत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

उद्धव ठाकरे – या व्यतिरिक्त सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -