घरमहाराष्ट्रशिवसेनेला पाठिंबा द्यावा का? काँग्रेस-राष्ट्रवादीचे 'पहले आप, पहले आप'

शिवसेनेला पाठिंबा द्यावा का? काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘पहले आप, पहले आप’

Subscribe

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी सकारात्मक असली तरी पाठिंबा जाहीर करण्यासाठी दोन्ही पक्ष एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठका थोड्या वेळापूर्वी पार पडलेल्या आहेत. दिल्लीत काँग्रेसची बैठक झाल्यानंतर महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीत प्राथमिक चर्चा झाली असून अंतिम निर्णय राज्यातील नेत्यांशी बोलून घेतला जाईल, असे सांगितले. तर मुंबईत राष्ट्रवादीने देखील काँग्रेसचा निर्णय आल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु, असे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘पहले आप, पहले आप’मध्ये शिवसेना मात्र अधांतरी राहते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुपारी ४ वाजल्यानंतर चित्र स्पष्ट

काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीची बैठक दिल्ली येथे पार पडली. यावेळी सत्तास्थापनेबाबत काँग्रेसचे आमदार आग्रही असल्याचे सांगितले गेले. मात्र अंतिम निर्णय राज्यातील नेत्यांशी बोलून दुपारी ४ वाजता निर्णय जाहीर केला जाणार आहे. काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर राष्ट्रवादीही ४.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले की, “काँग्रेस पक्षाचा निर्णय अजून झालेला नाही. दुपारी ४ वाजता महाराष्ट्रातील नेत्यांसोबत त्यांची बैठक संपल्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करु.”

- Advertisement -

तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळीच जाहीर केले होते की, काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीमध्ये निवडणूक लढवली होती. त्यामुळे काँग्रेसला वगळून आम्ही आमचा निर्णय घेणार नाही. काँग्रेसचा जो निर्णय होणार, त्यावरच आमचा निर्णय ठरणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -