घरमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांना मोठा धक्का; काँग्रेसचे मुंडे पंकजा मुंडेंना विजयी करणार?

धनंजय मुंडे यांना मोठा धक्का; काँग्रेसचे मुंडे पंकजा मुंडेंना विजयी करणार?

Subscribe

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ हा प्रत्येक निवडणुकीत राज्यात चर्चेचा विषय ठरत असतो. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत भाऊ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या थेट लढतीमुळे परळीच्या निकालावर राज्याचे लक्ष असते. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत नाहीत, तोच परळीच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस टी.पी. मुंडे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. टी.पी.मुंडे यांनी २०१४ साली परळीमधून विधानसभा लढवली होती. १४ हजार ९४६ मते घेऊन ते तिसऱ्या स्थानी होते.

परळी विधानसभा मतदारसंघ हा पुर्वीपासून काँग्रेसकडे होता. मात्र २०१४ साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. यावेळी परळीची जागा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे टी.पी.मुंडे नाराज होते. त्यांनी आज परळी तालुक्याती काँग्रेस कार्यकारणी विसर्जित करुन भाजपमध्ये प्रवेश केला. मुंडे यांनी १९९९ पासून गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांच्याविरोधात निवडणुका लढविल्या आहेत. परळी तालुक्यात त्यांना माननारा मोठा मतदारवर्ग आहे. २०१४ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी ९६ हजार ९०४ मते घेतली होती, तर धनंजय मुंडे यांना ७१ हजार ००९ मते मिळाली होती. काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी असती तर पंकजा मुंडे यांचे मताधिक्य आणखी कमी झाले असते.

- Advertisement -

धनंजय मुंडे यांच्यामुळेच मी भाजपमधून बाहेर पडलो होतो. आता पुन्हा एकदा त्यांच्यामुळेच मी काँग्रेस सोडून पुन्हा भाजपमध्ये जात असल्याचे टी.पी.मुंडे म्हणाले आहेत. पकंजा मुंडे यांना विजयी करण्यासाठी पुर्ण प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी मुंडे यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांनी देखील टी.पी.मुंडे भाजपमध्ये आल्यामुळे माझा विजय सोपा झाला असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -