घरमहाराष्ट्रठरलं, काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा?

ठरलं, काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा?

Subscribe

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आमदारांचे एकमत झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा आज सूटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात आज काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर आज शिवसेनेला जवळ घ्यावे का? या संदर्भात काँग्रेसच्या गोटात चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना जयपूरला पाठवले आहे तर शिवसेनेने देखील आपले सर्व आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवले आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपकडून आमदारांना फोडण्यासाठी ५० कोटीची ऑफर दिली जात असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर भविष्यात असा कुठलाही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये म्हणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विचार काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या आमदारांशी पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरु आहे.


हेही वाचा – शिवसेनेने पाठिंबा दिल्यास आम्ही सत्ता स्थापन करू – काँग्रेस

- Advertisement -

 

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? या विषयावर चर्चा सुरु

दरम्यान, या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? याच विषयावर चर्चा सुरु आहे. या चर्चेत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी ‘भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी ही संधी आहे’, असे मत मांडले आहे. याशिवाय काँग्रेसचे बरेच नेते यासाठी तयार आहेत. त्यामुळे काँग्रेस बाहेरुन शिवसेनेला पाठिंबा देईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दुसरीकडे भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसंदर्भात पत्र पाठवले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक सुरु आहे. या बैठकीत भाजप काय निर्णय घेते, त्यावर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय गणित आखले जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते माणिक ठाकरे यांनी भाजपकडून राज्यातील जनतेवर पुन्हा निवडणुकीचा दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हा आरोप केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -