घरमहाराष्ट्रपदांच्या वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद?

पदांच्या वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद?

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपदावरून धुसफूस सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन २४ तास देखील उलटत नाहीत तोवर दोन्ही काँग्रेसमध्ये पदांच्या वाटपावरून वाद सुरू झाल्याचं समजतंय. आधी विधानसभा अध्यक्षपदावरून आणि नंतर उपमुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. ठरल्याप्रमाणे काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार होतं. मात्र, आता काँग्रेसने अध्यक्षपद राष्ट्रवादीसाठी सोडण्याची तयारी केली असून त्याबदल्यात उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. तर तिकडे अजित पवार देखील अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट करत असल्याचं समजतंय. त्यामुळे नव्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचं मोठं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर असेल.

अजित पवारांना मुख्यमंत्रीपद हवंय?

उद्धव ठाकरे यांच्यासोबत गुरुवारी एकूण ६ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात-नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ-जयंत पाटील आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे-सुभाष देसाई यांचा समावेश आहे. मात्र, त्याआधीच अजित पवारांनी सकाळी नॉट रिचेबल होत नाराजीनाट्याचा श्रीगणेशा केला. अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदच अडीच वर्षांसाठी हवं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असं असताना आता दोन्ही काँग्रेसमध्ये अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपदावरून देखील धुसफूस सुरू असल्याचं समजतंय.

- Advertisement -

हेही वाचा – पहिल्याच कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला दिलासा

काँग्रेसची राष्ट्रवादीकडे नवी मागणी

काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव प्रस्तावित केलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला विरोध दर्शवला असून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं अध्यक्षपदावरचा दावाच सोडण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याबदल्यात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. पण राष्ट्रवादीकडून जे ठरलं आहे, त्यात बदल करण्यास नकार देण्यता आल्याचं वृत्त आहे. शिवाय, काँग्रेसकडून २ अतिरिक्त मंत्रीपदांची देखील मागणी केली जात असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -