घरदेश-विदेशमतदानाच्या दिवशी 'एक्झिट पोल'वर बंदी

मतदानाच्या दिवशी ‘एक्झिट पोल’वर बंदी

Subscribe

भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २१ ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. तर १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यादिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

२१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता, त्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवले जाऊ शकणार नाहीत.  – शेफाली शरण, निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या

- Advertisement -

महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीसह महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपुर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, आसम, बिहार, छत्‍तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्‍यप्रदेश, मेघालय, ओदिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्‍थान, सिक्कि‍म, तामिळनाडू, तेलंगणा, उत्‍तरप्रदेश या १७ राज्यांधील ५२ विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. तसेच दोन दिवसात म्हणजेच २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.


हेही वाचा – ‘भाजपाचा जाहिरनामा म्हणजे पाच वर्षातील अपयशाचा कबुलीनामा’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -