घरमुंबईभाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना निवडणूक आयोगाची नोटीस

भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना निवडणूक आयोगाची नोटीस

Subscribe

निवडणूक आयोगाने भाजप पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना नोटीस पाठवली आहे. वादग्रस्त आणि चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल आयोगाने ही नोटीस पाठवली आहे. १९९२ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीच्या आधी जे बॉम्बस्फोट झाले होते, त्यातील बॉम्ब हे मुंबादेवीच्या परिसरात बनविण्यात आल्याचे वक्तव्य केले होते. मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांच्या प्रचारादरम्यान लोढा यांनी हे वक्तव्य केले होते. या मतदारसंघात मुस्लिम मदारांची संख्या लक्षणीय आहे.

लोढा यांनी आपल्या प्रचारफेरीत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. “१९९२ ची दंगल आठवा. मुंबईत किती बॉम्बस्फोट झाले किती गोळ्या झाडल्या गेल्या. ते सर्व बॉम्ब या मतदारसंघातील पाच किमीच्या आतल्या परिसरात तयार केले गेले होते. त्या परिसरातून ज्यांना मते पडतात ती व्यक्ती जिंकल्यास तुमची काळजी घेतली जाईल का?” असे वक्तव्य लोढा यांनी केले होते.

- Advertisement -

या वक्तव्यानंतर लोढा यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. हे वक्तव्य करत असताना लोढा यांनी कोणत्याही परिसराचे नाव मात्र घेतले नव्हते. त्यांनी फक्त मुस्लिम बहुल परिसर भेंडी बाजार आणि नागपाडाचा नाव न घेता ओझरता उल्लेख केला होता. विशेष म्हणजे लोढा यांनी जेव्हा हे वक्तव्य केले, त्याच्या थोड्यावेळानंतरच आदित्य ठाकरे देखील या प्रचारफेरीत सामील झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -