हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे – एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही किंवा त्यांना गेल्या पाच वर्षांत पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही, तरीही त्यांनी कुठेही पक्षाची तक्रार केली नाही किंवा पक्षाला सोडचिठ्ठी दिली नाही. खडसे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. खडसेंची राजकीय कारकिर्दी संपवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. मात्र 'हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे. त्यामुळे कितीही काही झाले तरी आपण डगमगणाऱ्यातले नाही', असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

Mumbai
eknath khadse
एकनाथ खडसे

भाजप पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे तिकीट कापले. त्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासोबतच खान्देशातील अनेक खडसे समर्थक रस्त्यावर उतरले होते. खडसेंवर पक्षाकडून अन्याय झाला, अशी भावना त्यांची होती. खडसे समर्थकांनी संताप व्यक्त केल्यानंतर अखेर भाजपने उमेदवारांच्या शेवटच्या यादीत एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे खडसे समर्थकांचा राग निवळला. खडसे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही किंवा त्यांना गेल्या पाच वर्षांत पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही, तरीही त्यांनी कुठेही पक्षाची तक्रार केली नाही किंवा पक्षाला सोडचिठ्ठी दिली नाही. खडसे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. खडसेंची राजकीय कारकिर्दी संपवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. मात्र ‘हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे. त्यामुळे कितीही काही झाले तरी आपण डगमगणाऱ्यातले नाही’, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. दसरा निमित्त रावेरे येथे महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्या प्रचाराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


हेही वाचा – अश्रू… खरे आणि खोटे!


 

‘सब मिलके आओ और नाथाभाऊ को गिराओ’

‘बरेच रामायण घडले. महाभारताचा पहिला अध्यायही आटोपला. मात्र नाथाभाऊ भाजपमध्ये आहे. आता सब मिलके आओ और नाथाभाऊ को गिराओ. म्हणून आघाड्या-बिघाड्या सुरु आहेत. अरे, हा नाथाभाऊ अभिम्यू नाही, तर अर्जुन आहे’, असे एकनाथ खडसे म्हणाले. गेल्या पाच वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना पक्षाच्या आदेशानुसार मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून आतापर्यंत एकनाथ खडसे यांना पक्षात दुय्यम प्रकारची वागणूक दिली जात असल्याचे बऱ्याचदा निदर्शनास आले. खान्देशात मुख्यमंत्र्यांची सभा असली की, एकनाथ खडसे यांची खुर्ची मुख्यमंत्र्यांपासून बरीच लांब ठेवली जायची किंवा बऱ्याचदा पक्षाच्या कार्यक्रमात एकनाथ खडसेंना भाषणाची देखील संधी दिली गेली नाही. त्यामुळे खान्देशात भाजपमध्येच खडसे समर्थकांचा वेगळा गृप पडला. दरम्यान, खान्देशचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जवळीक वाढल्याने खडसे यांच्यासोबत अशी वागणूक दिली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, तरीही खडसे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – या संकटकाळात काँग्रेससाठी मी ‘बाजीप्रभू’ : बाळासाहेब थोरात