घरमहाराष्ट्रमाझं आणि पंकजाचं एकमत - एकनाथ खडसे

माझं आणि पंकजाचं एकमत – एकनाथ खडसे

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर केलेल्या सूचक विधानामुळे भाजपमध्ये फूट पडणार का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भाजपमध्ये पक्षांतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा एक मोठा गट नाराज असल्याचं आता समोर येऊ लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंची संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट झाल्यानंतर लगेच एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी काही सूचक विधानं केलं. त्यामुळे भाजपमधला एक मोठा नाराजांचा गट फूट पाडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. ‘नाराजांची मोट बांधण्याची आवश्यकता नसते. जे नाराज असतात, ते आपोआप एकत्र येतात. भाजपअंतर्गत काही विरोधी लोकांमुळे पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांचा पराभव झाला यावर माझं आणि पंकजाचं एकमत झालं आहे’, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.


हेही वाचा – भाजपमध्ये फूट पडणार? एकनाथ खडसेंच्या घरी तावडेंसोबत बैठक!

‘पराभवाची जबाबदारी नेतृत्वानं घ्यायला हवी’

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी भाजपचं राज्यात नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी घ्यायला हवी असा अप्रत्यक्ष टोला खडसेंनी यावेळी लगावला. ‘ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी पराभवाची जबाबदारी घ्यायला हवी. बाकी तुम्ही समजदार आहात. यश माझ्यामुळे आणि अपयश दुसऱ्यामुळे हे आम्ही कधीही शिकलो नाही. आम्हीही पराभव झाला तर मान्य करतो. तशी पराभवाची जबाबदारी घेतली पाहिजे. ज्यांनी कुणी नेतृत्व केलं, त्यांनी पराभव मान्य केला पाहिजे’, असं खडसे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘ओबीसी नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न’

विधानसभा निवडणुकीत ओबीसींचं नेतृत्व करणाऱ्यांचा पराभव झाला. भाजपमधल्याच काही गटांमुळे हा पराभव झाल्याचं दुर्दैवाने खरं दिसत आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीट नाकारण्यात आलं. पंकजा मुंडे पडल्या. प्रकाश मेहतांनाही तिकीट नाकारलं गेलं’, असंही खडसे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -