घरमहाराष्ट्रपराभवाची जाणीव पक्षाला करून दिली होती, पण ऐकलं नाही - एकनाथ खडसे

पराभवाची जाणीव पक्षाला करून दिली होती, पण ऐकलं नाही – एकनाथ खडसे

Subscribe

निकालाच्या पुर्वसंधेला प्रतिक्रीया देताना एकनाथ खडसे यांनी मी नव्या विधानसभेत नसेन याची खंत मला आयुष्यभर लागून राहिल अशी भावनिक प्रतिक्रीया दिली होती.

एकीकडे शिवसेना आणि भाजप महायुती राज्यात सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असतानाच दुसरीकडे भाजपचेच राज्यातले ज्येष्ठ नेते मात्र पराभवाची चव चाखत असल्याचं चित्र दिसत आहे. भाजपचे राज्यातले ज्येष्ठ नेते आणि ज्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारली गेली, ते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे पराभूत झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोहिणी खडसेंच्या पराभवाला शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील निमित्त ठरले आणि तेच विजयी झाले. रोहिणी खडसे यांना ८८ हजार ३६७ मते मिळाली तर शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील ९० हजार ६९८ मते मिळवून विधानसभेत पोहोचले. निकालाच्या पूर्वसंध्येला प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी ‘मी नव्या विधानसभेत नसेन याची खंत मला आयुष्यभर लागून राहील’, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आपल्या कन्येच्या विजयासाठी ते जंगजंग पछाडत असताना मुक्ताईनगरमधील त्यांच्या हक्काच्या मतदाराने त्यांना पाठ दाखवत शिवसेनेच्या बंडखोराला साथ दिली. नाशिकसह उत्तर महराष्ट्रात ४८ जागांपैकी सुमारे २० हून अधिक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले असून बंडखोरांनाही आयता प्रवेश देण्यास भाजपची रणनीतीच निमित्त ठरली.

‘अब की बार २२० पार’ हे फक्त प्रोत्साहनासाठी’

दरम्यान, ‘आम्ही अब की बार २२० जेव्हा म्हटलो, तेव्हा ते कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी होतं. आम्ही कुठे कमी पडलो, ते पक्ष नंतर तपासेलच. पण पक्षाला अशा पराभवाबद्दल मी जाणीव करून दिली होती. निर्णयाचा फेरविचार करावा, असं देखील पक्षाला सुचवलं होतं. पण पक्षानं ते मानलं नाही. जनतेनं कमी मताधिक्यानं का होईना, पण नाकारलं, हे मान्य करायला हवं. पुढे काय होईल, हे आज सांगू शकत नाही’, असं देखील एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -