‘शिंदे’ मास्तरांच्या देखरेखीखाली आमदार!

शनीवारपासून मढ येथील द रिट्रीट हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेना आमदारांसाठी स्वप्नील बांदोडकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Mumbai
Eknath shinde
Eknath shinde

एकनाथ शिंदे…शिवसेनेतील एक मोठे नाव..आणि नुकतीच शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेले असे हे शिवसेनेचे. पण मागील काही वर्षांत एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेमध्ये इतके प्रस्थ वाढले आहे की आमदारही एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखाली नाहीत. यायच प्रत्यय आज मढ येथील द रिट्रीट या पंचतारांकित हॉटेल्समध्ये आला. उद्धव ठाकरे हे आमदारांसोबतची बैठक आटोपून मातोश्रीच्या दिशेने निघाले. तसे सर्व आमदार आपापले जेवून हॉटेल्सच्या लॉबीमध्ये तळमजल्यावर बसले होते. यावेळी लॉबीच्या एका सोप्यावर एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते अनिल देसाई हे देखील गप्पा मारत बसले होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे याच लॉबीमध्ये बसलेल्या अनेक आमदारांना आराम करण्यासाठी आपापल्या रुमवर जायचे होते. मात्र आपला एवढा मोठा नेता बसलेला असताना आपण कसे काय जायचे असा प्रश्न बऱ्याच आमदारांना पडला होता. दरम्यान, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र शिंदेसाहेब आता वरती रूमवर गेले तर चालेल का? असे विचारले आणि त्यांची परवानगी घेऊनच मग दीपक भाई रुमवर आराम करण्यासाठी गेले.

एकनाथ शिंदेंसोबत फोटो काढण्याचा मोह आवरेना

सगळ्यात महत्वाचे म्हणजे लॉबीमध्ये बसलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी देखील आमदारांचे बरेच कार्यकर्ते त्यांच्याकडे येत या सर्वांसोबत एकनाथ शिंदे यांनी फोटो काढले. यावेळी शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो काढला.

आमदारांना मराठी गाण्याची मेजवानी

शनीवारपासून मढ येथील द रिट्रीट हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेना आमदारासाठी आज संध्याकाळी स्वप्नील बांदोडकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम हॉटेलमध्ये ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा –

भाजपची चार वाजता पुन्हा बैठक; राज्यपालांच्या निमंत्रणाला आज उत्तर देणार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here