घरमहाराष्ट्रप्रचाराचा भोंगा शांत झाला; आता वेध मतदानाचे

प्रचाराचा भोंगा शांत झाला; आता वेध मतदानाचे

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मागच्या दोन आठवड्यांपासून भाषणाचा भोंगा सुरु होता. आता हा भोंगा शांत झालाय.

विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे झंझावाती दौरे, प्रचारसभांमध्ये रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी आणि कोपरा बैठकांमुळे गेले दोन आठवडे राज्यभरात पेटलेले राजकीय प्रचाराचे रण शनिवारी थंडावले. बाईक रॅली, प्रचारफेरी, पदयात्रा आणि रोड शोवर भर देत उमेदवारांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्याने सर्वांना मतदानाचे वेध लागले आहेत.

निवडणूक प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसेचे नेते राज ठाकरे यांनी ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत विदर्भात काही ठिकाणी सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी ‘पुन्हा मीच येईन’ अशी साद मतदारांना घातली.

- Advertisement -

चौदाव्या विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता आज संध्याकाUी सहा वाजता झाली. तत्पूर्वी मुंबई, ठाण्यात सर्वपक्षीय उमेदवारांनी बाईक रॅली, प्रचारफेरी, पदयात्रा, रोड शो करीत मतदारांना आकर्षित करण्याचा अखेरचा प्रयत्न केला. शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. हातात पक्षाचे झेंडे, डोक्यावर टोपी, अंगावर उपरणे घालून कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या सन्मानार्थ घोषणाबाजी करत होते. उमेदवारांच्या प्रचारफेर्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. उमेदवारांच्या रोड शो आणि बाईक रŸलीचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झालेला दिसला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

प्रचारात पावसाचे विघ्न

दरम्यान, निवडणूक प्रचारात आज पावसाचे विघ्न आले. सकाUपासून मुंबई-ठाणे परिसरात ढगाU आणि कुंद वातावरण होते. अशा वातावरण पावसाच्या हलक्या सरींना सुरूवात झाली. संध्याकाUी प्रचाराची मुदत संपेपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कोसUू लागल्याने काही ठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -