घरमुंबईअखेर डोळस मतदाराला मिळाला न्याय

अखेर डोळस मतदाराला मिळाला न्याय

Subscribe

सामान्य मतदाराची पावती मिळाली

डोळस मतदाराला दिलेले ब्रेल लिपीतील मतदान पावती देण्याची चूक अखेर निवडणूक विभागाकडून सुधारण्यात आली आहे. आज या मतदाराला सामान्य मतदारांसारखीच पावती देण्याची औपचारिकता मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांमार्फत करण्यात आली. ‘आपल महानगर’ने याबाबतचे वृत्त १८ ऑक्टोबरच्या अंकात दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणात आपली चूक सुधारत योग़्य ते ओळखपत्र दिले असल्याचे कबूल केले आहे. दहिसर विधानसभा मतदारसंघात डोळस मतदाराला ब्रेल लिपीतील मतदान पावती देण्याचा प्रकार निवडणूक विभागाकडून करण्यात आला होता.

महापालिकेकडे असणार्‍या नोंदीनुसार आम्ही हे ओळखपत्र दिले आहे. या संपूर्ण यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत आमचा सहभाग नाही. ही यादी महापालिकेकडून अद्ययावत होते. म्हणून महापालिकेकडूनच यामध्ये चुकीची नोंद झाली असावी असे सांगत निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणात हात वर केले आहेत. पण मतदाराची गैरसोय होऊ नये म्हणूनच अखेर या मतदाराला मतदार पावती देण्यात आली आहे, असे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

ब्रेल पावतीच्या प्रकरणाचा पाठपुरावा

ब्रेल लिपीतील पावती देणार्‍या निवडणूक कर्मचार्‍यांना दहिसर विधानसभेच्या मतदार नोंदणी अधिकार्‍यांनी बोलवून घेतले होते. नक्की कोणत्या कर्मचार्‍याकडून ही चूक झाली हे पाहण्यासाठी या कर्मचार्‍याला हजर राहण्यास सांगितले होते. अखेर चूक लक्षात आल्यानेच एका नवीन पर्यवेक्षकाला पाठवून ही मतदार पावती देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -