घरमुंबईबहुमत चाचणीवेळी आमदार गडबडले; आव्हाडांकडून सुरूवात

बहुमत चाचणीवेळी आमदार गडबडले; आव्हाडांकडून सुरूवात

Subscribe

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व आमदारांनी सत्तास्थापनेपर्यंत आपली कामगिरी चोख आणि बरोबर बजावली असली तरी बहुमताच्या चाचणीवेळी आमदार गडबडलेले दिसले आणि सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व आमदारांनी सत्तास्थापनेपर्यंत आपली कामगिरी चोख आणि बरोबर बजावली असली तरी बहुमताच्या चाचणीवेळी आमदार गडबडलेले दिसले. सभागृहात बहुमत चाचणी घेताना, प्रत्येक सदस्याला उभे राहून त्याचा मत क्रमांक सांगायचा होता. या हेड काऊंटला मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून सुरुवात झाली. दुसर्‍या रांगेत जितेंद्र आव्हाड होते. आव्हाड यांच्या आधी के. सी. पाडवी यांचा नंबर १५ होता. त्यानंतर आव्हाड यांनी आपल्या नावासह १६ नंबर सांगणे अपेक्षित होते. पण, आव्हाड यांनी २० नंबर सांगितला आणि हास्याचे फवारे उडाले.

- Advertisement -

त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी १७ नंबर सांगून हेड काऊंट पुढे सुरू केला. तसेच हेड काऊंटमध्ये ४१ व्या नंबरवर असताना आमदार कैलास किसनराव यांनी ४२ नंबर सांगितला. त्यामुळे पुन्हा गोंधळ उडाला. त्यानंतर लगेचच अस्लम शेख रमजान अली यांनी ४३ ऐवजी ४२ नंबर सांगितला. त्यांना चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पुन्हा ४३ नंबर सांगितला. पुढे राजन साळवी यांनी ५७ ऐवजी ५६, तर मंगेश कुडाळकर यांनी ६२ ऐवजी ६३ क्रमांक सांगितला. आमदार बालाजी कल्याणकर यांनी १०० क्रमांकाऐवजी ७८ क्रमांक सांगितला. इतर आमदारांनी १००, १०० असा ओरडा केल्यानंतर त्यांनी चूक दुरुस्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – नव्या सरकारच पहिल अधिवेशन; विरोधकांची वॉकआऊटने ओपनिंग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -