घरफिचर्समैत्री धर्म की खुर्ची धर्म ?

मैत्री धर्म की खुर्ची धर्म ?

Subscribe

सबका साथ पक्ष आणि हिंद सेना कित्येक वर्षांपासूनचे सत्तामित्र होते. मुळात सबका साथ पक्षाला राज्यात पाळमूळं रोवण्यासाठी हिंद सेनेनेच हात दिला होता. सुरूवातीपासूनच आक्रमक अशा हिंद सेनेचाच रूबाब होता. आवाज कुणाचा म्हटल्यावर, सबका विकास पक्षातील नेते स्वत:च तुमचाच असे म्हणायचे. त्यामुळे इतकी वर्षे फुल देऊन त्यांचं आदरातिथ्य करण्यावाचून सबका विकास पक्षाला पर्याय नव्हता. परंतु, आता आलेल्या मोठ्या लाटेने बरेच पाणी डोक्यावरून गेले होते.फुल फुलले होते.त्यामुळे त्यांच्यासमोर डरकाळी आता कमी पडत होती. हिंद सेनेने आपला आवाज वाढवून कशीतरी आपली बार्गेनिंग पॉवर जपून ठेवली होती.स्वबळ ते बार्गेनिंग पॉवर हा त्यांचा प्रवास त्यांच्याच सैनिकांना थक्क करणारा होता.त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत विशेष काही गर्जना होणार नाही,याची सर्वांनाच खात्री होती.सबका विकास पक्षाने आपला याआधीचा सक्सेस ग्राफ हिंद सेनेसमोर ठेवला,तर हिंद सेनेने आपल्या भगव्या कापडातून दोन विटा बाहेर काढत कधी रचताय? एवढं विचारलं.

तरी पण ही सिटांची घासाघिस आठवडाभर चालली.गेली पाच वर्ष चाललेल्या अपमानाचा बदला म्हणून मुख्यमंत्री आपलाच असला पाहिजे तर आपलीच सत्ता अबाधित असली पाहिजे अशी दोन्ही मित्रपक्षांची छुपी रणनीती होती. (जी एव्हाना दोन्ही पक्षांना आणि जनतेला देखील समजली होती.)गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षांत मेगाभरती आणि घरवापसी देखील झाली होती. तोडीस तोड नेते आपल्या पक्षात घेतल्यामुळे दोन्ही पक्षांनी सत्तेच्या मजबुरीने का होईना गळ्यात गळे घातले होते.जागा वाटल्या गेल्या,आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.सलग पाच वर्षे एकमेकांच्या उरावर बसलेल्या कार्यकर्त्यांना आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालण्याचा टास्क दोन्ही पक्षांसाठी होता.

- Advertisement -

पण या गळामिठीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा खिशात खंजीर ठेवण्याचा आदेश मात्र दिला गेला होता.आपल्याच जागा जास्त निवडून आल्या पाहिजेत आणि सत्ता देखील आपल्यालाच हवी फक्त तुम्ही एकमेकांशी दगाफटका करू नका असे सांगण्यात आले होते.त्यामुळे कार्यकर्ते देखील गोंधळले होते.नेमकं काय करायचं हे त्यांना सुचेनासं झालं होतं.परंतु,सत्तेपेक्षा मैत्री आणि शब्द यांना राजकारणात महत्व नसल्याचं कार्यकर्त्यांना पण समजल होतं.त्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते बंडखोरांच्या गोटात सामिल होवून एकमेकांविरोधात काम करताना दिसत होते.

( मॅजिक फिगर गाठायचा दोन्ही मित्रपक्षांचा आटोकाट प्रयत्न आहे…त्यासाठी दोघांनाही भरपूर पसरायचं देखील आहे..सत्तेची खुर्ची तेवढीच अवाढव्य देखील आहे.खुर्चीपर्यंत पोहचण्यासाठी खंजीर,गद्दारी अशा शिड्यांचा वापर करावा लागेल.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -