घरफिचर्सघोडं गंगेत न्हाल

घोडं गंगेत न्हाल

Subscribe

सकाळीच्या पहिल्याच एसटीला बाबल्याला जाताना पाहून, काय रे बाबल्या,खय चललंस ? वरच्याघरातून तात्यांनी जोरदार हाक दिली.अहो काय सांगा तुमका तात्यांनो ,तो सोन्याचो दिवस आज शेवटी उजाडलोच,बाबल्याने आनंदाच्या भरात सांगितले.कसलो सोन्याचो मेल्या,ती खालच्या जमनीची केस जिंकलंस काय? बरा झाला बाबा,किती वर्षा गेली तेच्याच तुझी,त्यांनी जरा बाबल्याचे अभिनंदन केले.नाय हो तात्यानु,अहो काय सांगा,दादांच्या हातात आता प्रेमाचा फुल पडतला,अहो दादांचो आता ‘सबका विकास’ पक्षात प्रवेश आसा त्येंचो आज कनकनगरीत लय मोठे बॅनर लावल्यानी हत दादांनी,बाबल्या आज जोशमध्ये होता.अरे,पण पैल्या एसटीन जावन करतल तरी काय हं? तात्यांनी प्रश्न विचारला.अहो,लयं कामा आसात,तुमका नाय समजाचा? बाबल्या थोडा वैतागतच म्हणाला.अरे,बाबा गेल्या दहा वर्षांत चार वेळा याच तू याच जोशात गेलंस,दादा फिरततं हयना थयं,तात्यांनी पण बाबल्याला प्रत्युत्तर दिले.

अहो,जावंदे,हो आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचे जीव आसात दादा,अहो अख्ख्या वाडीत एकटो का असेना,एकटो भिडतय मी सगळ्यांना,हे गंडे बांधलेले इतके दिवस आकडान दाखवत होते ना,त्येंका आता दाखवतयं ,लय उडान दाखवत होते,ना बघतयं एकेकांकडे,बाबल्या मोठ्या रूबाबत म्हणाला.अरे,पण तू एकटो आता काय करतलं? तात्यांनी पुन्हा त्याला पेटवायचा प्रयत्न केला.तात्यांनु,तुमका माहित आसाच,हे सगळे उडी मारलेले आसत ना ते सत्तेच्या गुळाच्या ढेपेक चिकाटलेले मुंगळे आसात,आता आम्हीच सत्तेत इलव मग येतले पुन्हा बघा कशे पटापट,आणि आता दादांचो कमळातलो फोटो शर्टाक लावन बघा कसो गावभर फिरतलयं तो,जळतले सगळे बघा,बाबल्या म्हणाला.तात्यांनी मात्र मात्र बाबल्यासारख्या कट्टर समर्थकाची दाद दिली.अरे,पण ते मुठी आवळलेले बॅनर जरा ठेवून जा रे,भात झोडूक गावतील ,मागच्या येळाक ते हातवाल्यांचे बॅनर कोकम सुकूक तरी उपयोगाक इलले,तात्या थोड्या खोचक शब्दात म्हणाले. देतय,हो जावा घेवन आणि जरा लक्ष ठेवा.

- Advertisement -

मागच्या येळेक ते पक्षाचे उरलेले पट्टे दिललंय तुमका,ते वयक बांधाक वापरलास आणि मतं दुसर्‍याकच देवन इलास,आता तसा करो नको,बाबल्यानेही तात्यांना टोला हाणला.त्यानंतर चला येतय म्हणत बाबल्या पुन्हा जोशात,एसटीने कनकनगरीत पोहोचला.दादांचे आणि मुख्यमंत्र्यांचे चौकात मोठाले बॅनर लागले होते.बॅनरमध्ये दादांचा चेहरा आता हसरा दिसत होता.इतकी वर्ष दादागिरी चालली आता दादांनी हवेशी आणि लाटेच्या प्रवाहाशी जुळवून घेण्याचं ठरवलं होतं.दादांची इतरांना मसलन्याची पावर मुख्यमंत्री सायबांना चांगलीच माहिती होती.त्यामुळे दादांच्या दादागिरीने अनेक बाण बोथट करण्याची योजना होती.दादांचा आक्रमक स्वभाव मुख्यमंत्री सायबांना फक्त विरोधकांपुरताच वापरायचा होता.हे आक्रमण आपल्यावर येऊ नये याची पुरेपूर काळजी त्यांना घ्यावी लागणार होती.

बाबल्यासहीत दादांच्या अनेक ‘अभिमानी’कार्यकर्त्यांनी पक्षांतराच्या सोहळ्यात हातापासून अगदी आवळलेल्या मुठीत हळूच फुल पकडले.गळ्यात पक्षाचे पट्टे घातले.संध्याकाळी बाबल्या नव्या वाडीत नव्या रूबाबात दिसत होता.गेल्या अनेक महिन्यांच्या मौनानंतर आता कुठे त्याला बोलण्याची संधी मिळणार होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -