Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यातल्या राजकारणाची देशभरात चर्चा; ट्विटरवर महाराष्ट्र ट्रेंडिंगमध्ये!

राज्यातल्या राजकारणाची देशभरात चर्चा; ट्विटरवर महाराष्ट्र ट्रेंडिंगमध्ये!

शिवसेना आणि भाजपमध्ये राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात सुरू असलेला वाद आता ट्वीटरवर अवतरला असून नेटिझन्सनी एक सो एक ट्वीट करून राज्यातलं राजकारण देशभरात ट्विटरवर ट्रेंडिंगवर आणलं आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात सत्ता कुणाची स्थापन होणार? यासाठीची राजकीय धुमश्चक्री सध्या मुंबईत सुरू आहे. पण याची चर्चा थेट देशभरात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रातलया राजकीय घडामोडींकडे लागलं आहे. त्यामुळेच मुंबईत एकीकडे भाजप, शिवसेना यांच्या सत्तास्थापनेसंदर्भात घडामोडी सुरू असताना ट्विटरवर देशभरातील जनता #MaharashtraPoliticalCrisis या हॅशटॅगवर ट्विट करताना दिसत आहेत. ट्विटरवर सकाळपासूनच हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये असून नेटिझन्स महाराष्ट्रातल्या घडामोडींवर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहींनी तर त्यासाठी मीम्सचा देखील आधार घेतला आहे!

- Advertisement -

- Advertisement -

अनेक नेटिझन्सनी शिवसेना आणि भाजपच्या राजकीय गोंधळावर टीका करत मतदारांची बाजू मांडली आहे.


हेही वाचा – मला युती तोडायची नाही, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच-उद्धव ठाकरे

शिवसेनेने आमदारांच्या बैठकीमध्ये ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली असून आता भाजपकडून त्यावर कसा प्रतिसाद मिळेल, यावर चर्चा सुरू झाली आहे. जर भाजपसुद्धा मुख्यमंत्रीपदावर ठाम राहिली, तर शिवसेनेकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा करण्याचा पर्याय असेल. मात्र, तेही शक्य होऊ शकलं नाही, तर मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -