राज्यात पुढचे सरकारही भाजपचे असणार; मात्र घोडेबाजार करणार नाही – फडणवीस

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले राजकीय नाट्य आता काही तासात सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मिनिटांपूर्वी राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ८ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान शिवसेनेच्या सर्व आमदारांना सुरक्षा द्यावी, असे पत्र मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना लिहिले आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री ४.३० वाजता सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेणार आहेत.