‘नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या’

'महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या', असा टोला एमआयएम अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी भाजपला लगावला आहे.

Mumbai
mim mp asaduddin owaisi
हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवेसी

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्याचे नाव ‘संकल्पपत्र’, असे ठेवण्यात आले आहे. या संकल्पपत्राच्या मार्फत भाजपने महाराष्ट्राच्या जनतेला विविध आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांपैकी एक अश्वासन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्याचे आहे. मात्र, भाजपच्या या आश्वासनावरुन एमआयएम अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर टीका करत महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या, असा टोला लगावला आहे.

नथुराम गोडसेसांनाही भारतरत्न द्या

ओवेसी यांनी भाजपावर टिका करत म्हटले आहे की, ‘भारतरत्न फक्त एकट्या सावरकरांसाठी का? सावरकरांप्रमाणे महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेसाठी देखील भारताचा सर्वोत्कृष्ट सन्मान का मागत नाही’, असा सवाल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले आहे की, ‘महात्मा गांधीच्या हत्येच्या कटात सहभागी व्यक्तीला भारतरत्न देण्यासंबंधी कसा काय विचार केला जाऊ शकतो’. त्यामुळे जर तुम्ही सावरकरांना भारतरत्न देत असाल तर मग नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या’, असे म्हणत भाजपला टोला लगावला आहे.


हेही वाचा – सावरकरांना भारतरत्न! कन्हैया कुमारचे भगतसिंगबाबत मोठे वक्तव्य