घरविधानसभा २०१९मतदारांना मेक अप बॉक्स वाटले? आमदार प्रणिती शिंदेंविरोधात तक्रार

मतदारांना मेक अप बॉक्स वाटले? आमदार प्रणिती शिंदेंविरोधात तक्रार

Subscribe

आचारसंहिता भंग केल्याची पहिली तक्रार सोलापूरमध्ये दाखल झाली आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर मेक अप बॉक्स वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तोंडी तक्रार दिली आहे. पण, लिखित स्वरुपात तक्रार घेऊन चौकशीअंती तथ्य असल्यास कारवाई करु, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर प्रणिती शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावत आडम स्टंटबाजी करत असल्याचा प्रतिहल्ला केला आहे.

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा केली. तरीही, प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मेकअप बॉक्स वाटत होते असा आरोप आडम यांनी केला.

- Advertisement -

नरसय्या आडम यांनी केलेल्या आरोपानंतर प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ” गौरी-गणपतीपासून आम्ही मेक अप बॉक्सचं वाटप करत आहोत. शिवाय, प्रत्येक निवडणुकीत ही प्रथा आहे. प्रत्येक वेळेस माझ्या मतदारसंघात बिडी कामगार जास्त असल्यामुळे हे मी दरवर्षी करते. बिडी कामगार महिलाही असल्यामुळे त्यांना सन्मानित करण्याच्या दृष्टीकोनातून मी प्रयत्न करत असते. आडम यांची दर निवडणुकीला ही सवयच आहे. कोणत्याही निवडणुकीत ते स्टंट करत असतात आणि आरोपही करतात. आता ही त्यांनी फक्त तक्रार केली आहे. या आरोपांना कुठलंही तथ्य नाही आहे. ही प्रथा दरवर्षीची आहे. मी ज्या महिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते त्या महिलांचांच त्यांनी अपमान केला आहे असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया या सर्व प्रकरणी प्रणिती शिंदे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -