Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक मनसेच्या अशोक मुर्तडक यांची माघार; नाशिक पूर्वमध्ये रंगणार दुरंगी लढत

मनसेच्या अशोक मुर्तडक यांची माघार; नाशिक पूर्वमध्ये रंगणार दुरंगी लढत

नाशिक पूर्व मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने भाजपमधून बंडखोरी करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत असलेल्या बाळासाहेब सानप यांना मोठा दिलासा

Related Story

- Advertisement -

नाशिक पूर्व मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने भाजपमधून बंडखोरी करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत असलेल्या बाळासाहेब सानप यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिणामी या मतदार संघातून भाजपचे उमेदवार राहूल ढिकले आणि सानप यांच्यातच चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सोमवारी (दि. ७) सुरू झाली. बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. यात विशेषत: कोथरुड पॅटर्न राबविला जाणार असल्याचे सध्याच्या समीकरणांवरुन दिसते आहे. कोथरुड येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पराभूत करण्यासाठी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचित आघाडीने पाठिंबा दिला. त्याच धर्तीवर पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी माघार घेऊन राष्ट्रवादीच्या आमदार बाळासाहेब सानप यांना चाल दिल्याचे चित्र आहे. सानप आणि मुर्तडक हे दोघे वंजारी समाजाचे असून मतांचे धृवीकरण लक्षात घेता मुर्तडक यांची माघार सानपांचे पारडे जड करणारी आणि भाजपसाठी आव्हानात्मक ठरू शकेल.

पूर्वतयारी नसल्याने माघार : मुर्तडक

- Advertisement -

पूर्वतयारी अजिबात नसताना, केवळ राज ठाकरे यांच्या आदेशामुळे उमेदवारी अर्ज भरला. माझी स्वतःची अजिबात तयारी नव्हती. एवढ्या कमी कालावधीत विधानसभाच नव्हे तर ग्रामपंचायतीची निवडणूक लढणेही आव्हानात्मक असते. म्हणूनच माघार घेतली. आता नाशिक जिल्ह्यातील जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यासाठी मला फिरावे लागणार आहे, असे सांगत मुर्तडक यांनी राष्ट्रवादीसाठी माघार घेतली नसल्याचे सांगितले.

गणेश उन्हवणे निवडणुकीच्या रिंगणात

कवाडे गटाचे नाशिक पूर्वमधील उमेदवार गणेश उन्हवणे यांनी माघार घ्यावी, यासाठी जोगेंद्र कवाडे यांच्याकडून अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र, तरीही उन्हवणे स्वतःच्या निर्णयावर कायम राहिले. त्यामुळे आता नाशिक पूर्वमधून सानप आणि राहूल ढिकले यांच्याबरोबरच उन्हवणे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत.

नाशिक पश्चिममधून मामा ठाकरेंची माघार

- Advertisement -

शिवसेनेचे पदाधिकारी आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाशिक पश्चिमचे उमेदवार मामा ठाकरे यांनी सोमवारी (दि.७) माघार घेतली. एबी फॉर्म न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

- Advertisement -