घरमहाराष्ट्रशहरातील रस्त्यांवर सभा घेण्यास परवानगी द्यावी; मनसेची मागणी

शहरातील रस्त्यांवर सभा घेण्यास परवानगी द्यावी; मनसेची मागणी

Subscribe

शहरातील रस्त्यावर सभा घेण्यास निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी अशी मागणी आता मनसेने केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभक्षा रस्त्यावर घेण्याची परवानगी मनसेने निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. पाऊस लांबल्याने मैदानांमध्ये सभा घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर सभा घेण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र मनसेने राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहिले आहे.

काय आहे निवेदनात 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील मैदाने आरक्षित करण्यात आली आहेत. मात्र पावसामुळे मैदानांमध्ये पाणी साचत असल्याने मनसेसह सर्वच राजकीय पक्षांच्या सभा रद्द कराव्या लागत आहेत. पावसामुळे मैदानात चिखल होतो आणि पाऊस थांबला तरी चिखलामुळे सभा घेणे शक्य होत नाही, असे मनसेने निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

- Advertisement -

पुण्यातील सभा रद्द 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल पुण्यातून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचं बिगुल वाजवणार होते. मात्र, नमनालाच घडाभर तेल पडावं, त्याप्रमाणे राज ठाकरेंची पहिलीच सभा रद्द झाली. पुण्यामध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही सभा रद्द करावी लागली . त्यामुळे पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच राज ठाकरेंची सभा ऐकण्यासाठी जमा झालेल्या पुणेकरांचा देखील हिरमोड झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -