घरमहाराष्ट्रपवारांच्या पायखालची वाळू सरकली - गिरीश बापट

पवारांच्या पायखालची वाळू सरकली – गिरीश बापट

Subscribe

खासदार गिरीश बापट यांनी शरद पवार यांच्यावर पत्रकारांशी बोलताना टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पायाखालीची वाळू सरकली असल्याने ते अशा प्रकारची विधाने करू लागले आहेत, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कुस्ती ही मर्दासोबत केली जाते असे विधान पवार यांनी नुकतंच केलं होत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी उत्तर देताना ‘नटरंग’ सारखे हातवारे अशी कोपरखळी मारली होती. यासंदर्भात पत्रकारांनी बापट यांना विचारले असता बापट म्हणाले, पवार यांच्या वक्तव्याची दखल आमचे नेते घेतीलच. पवार यांच्यासोबत आज त्यांची ‘बी’ टीम देखील राहिली नाही. त्यांना एकट्याला सगळं करावं लागत आहे आणि त्यांना समोर पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि ते अशा प्रकारची विधाने करू लागले आहेत.

नरेंद्र मोदी यांची गुरुवारी सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात गुरुवार दि १७ ऑक्टोबर रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट आणि भाजपचे शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही सभा स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी चार वाजता होणार आहे. पावसाची शक्यता गृहीत धरून शेड असलेला मांडव उभा करण्यात येणार आहे. सुमारे ३५ हजार लोक या सभेला येतील अशी अपेक्षा आहे, असं बापट यांनी सांगितले. या सभेला जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी परळी आणि त्यानंतर सातारा येथे सभा होणार आहे. त्यानंतर ते पुण्यातील सभेस उपस्थित राहून नागरिकांना संबोधित करतील.

- Advertisement -

हेही वाचापरळीची लढत सोपी नाही; पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी अमित शाह नंतर मोदीही येणार


 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -