घरमहाराष्ट्रअखेर नारायण राणे यांचा मुलांसह अधिकृतपणे भाजपात प्रवेश

अखेर नारायण राणे यांचा मुलांसह अधिकृतपणे भाजपात प्रवेश

Subscribe

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश झाला आहे. त्यांच्यासोबतच त्यांचे थोरले चिरंजीव निलेश राणे आणि धाकटे चिरंजीव नितेश राणे यांचा देखील आज अधिकृतपणे भाजप प्रवेश झाला. कणकवली मतदारसंघात आज भाजपचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: आले होते. त्यांच्या उपस्थित राणे यांचा आपल्या मुलांसह आज भाजपप्रवेश झाला. ‘या दिवसाची मी फार वाट पाहत होतो. माझ्यासह निलेश राणे, नितेश राणे आणि सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला असे मी जाहीर करतो’, असे नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा – नाशिकमध्ये युती तुटली? बंडखोर उमेदवारासाठी शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांचा राजीनामा

- Advertisement -

नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. नितेश राणे यांच्या प्रचाराप्रत्यर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कणकवलीत आले होते. यावेळी त्यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. नारायण राणे यांनी नव्या आमदारांना संधी दिली, असे मुख्यमंत्री म्हणाले. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी नितेश राणे यांना सल्ला दिला आहे. नितेश राणे आक्रमक आहेत. परंतु, आता आक्रमकतेसोबत संयमही बाळगायला हवा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना दिला आहे. त्याचबरोबर नितेश राणे प्रचंड मतांनी निवडून येथील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – मेलेल्या विरोधकांनी स्वत:च्या राजकीय आणि नपुंसकतेवर आधी बोलावे – शिवसेना

- Advertisement -

१५ वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडा – मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे फक्त चार दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. भाजप पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरत आहेत. या सभांमध्ये मुख्यमंत्री विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. आजही त्यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून १५ वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मागितला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -