घरमहाराष्ट्रनारायण राणे यांना मोठा धक्का; कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश?

नारायण राणे यांना मोठा धक्का; कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश?

Subscribe

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना भाजप प्रवेशाअगोदर मोठा धक्का बसला आहे. नारायण राणे यांचे कट्टर समर्थक सतीश सावंत यांनी स्वाभिमानी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाले आहे. याशिवाय ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना सतीश सावंत हे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन केल्यानंतर दत्ता सामंत यांना जिल्हाध्यक्ष केले. त्यामुळे सतीश सावंत नाराज झाले. तेव्हापासून सतीश सावंत शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु होती. आता त्यांनी अधिकृतपणे स्वाभिमानी पक्षाला राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा सुरु आहे.

satish sawant
सतीश सावंत

 

- Advertisement -

दरम्यान, ‘मला कुडाळ मालवणमधून अपक्ष लढा असे सांगितले जात होते. तसेच नितेश राणे यांनी मला तुम्ही माझ्या कणकवली मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करू नका असे सांगितले. या सगळ्याला कंटाळून मी आज माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून येत्या दिवसात माझी भूमिका स्पष्टकरीन’, अशी प्रतिक्रिया सतीश सावंत यांनी आपलं महानगरला दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मी निवडणूक लढवणार; आदित्य ठाकरेंचा एल्गार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -