घरमुंबईनरेंद्र मोदींना इतिहास, घटनाक्रम,अर्थव्यवस्थेचे फार कमी ज्ञान

नरेंद्र मोदींना इतिहास, घटनाक्रम,अर्थव्यवस्थेचे फार कमी ज्ञान

Subscribe

माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते बिघडलेली अर्थव्यवस्था, प्रचंड वाढलेली बेरोजगारी अशा गंभीर विषयावर खरे बोलत नाहीत, ते भ्रामक आणि खोटा प्रचार करत आहेत. लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. विशेष म्हणजे मोदी यांना इतिहास, घटनाक्रम आणि अर्थव्यवस्थेचे फार कमी ज्ञान आहे, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केली आहे.

राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली. भारताची अर्थव्यवस्था संकटात आहे, बेरोजगारी प्रचंड वेगाने वाढते आहे, देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योग धंदे बंद पडले, कारखाने बंद पडले. गेल्या पाच वर्षात काय विकास केला? या सगळया प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान व मुख्यमंत्री देत नाहीत. गेल्या पाच वर्षात कोणती नवीन मोठी गुंतवणूक नाही, नवीन कारखाने उभे राहिले नाहीत, नवीन उत्पादन नाही, मागणी नाही त्यामुळे पुरवठा नाही.

- Advertisement -

उत्पादन क्षमता शून्याच्या खाली गेली आहे. नोटबंदी आणि जीएसटी मुळे देशावर आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. भाजप सरकारकडे यासाठी कोणतीच उपाय योजना नाही. निवडणूक प्रचार संपायला अजून दोन दिवस आहेत सरकारतर्फे कोणीही अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या या विषयांवर माझ्याशी अथवा माझ्या सहकार्‍यांशी खुल्या चर्चेसाठी जनतेच्या समोर यावे, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले .

नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वप्नात राहू नये. भारताचा जीडीपी दर ५ टक्क्यांवर आलेला आहे. २०२४ मध्ये ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी १० ते १२ टक्के जीडीपी दर सातत्याने पाहिजे. आधीच १,७०,००० करोडचे नुकसान झालेले आहे म्हणून आरबीआय कडून तुम्हाला १, ७६,००० कोटी घ्यावे लागलेले आहेत. माझ्या माहितीनुसार या वर्षीच्या बजेटमध्ये ७ लाख कोटींचे नुकसान होणार आहे. मोदी यांना इतिहास, घटनाक्रम, अर्थव्यवस्था या गोष्टींचे फार कमी ज्ञान आहे. त्यामुळे ते नेहमी चुकीचा संदर्भ लावत असतात आणि चुकीची माहिती देत असतात. , याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

यावेळी मुंबई काँगेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी आमदार सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार चरण सिंग सप्रा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते राजीव त्यागी आणि मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -