घरमहाराष्ट्रबीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, नमिता मुंदडा भाजपमध्ये

बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, नमिता मुंदडा भाजपमध्ये

Subscribe

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. मुंदडा परिवारातील नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर करून देखील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: आमदारकीच्या उमेदवारीसाठी ज्यांचं नाव जाहीर केलं होतं, त्या नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. काही दिवसांपूर्वीच जयदत्त क्षीरसागर यांनी देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ आता नमिता मुंदडा यांनी देखील भाजपची वाट धरल्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत नमिता मुंदडा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

धनंजय मुंडे गटामुळे नाराजी

गेल्या काही वर्षांपासून मुंदडा कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे त्रस्त असल्याचं बोललं जात होत. विशेषत: धनंजय मुंडे गटामुळे त्यात भर पडत होती. त्यामुळे आधीच नाराज असलेल्या मुंदडा कुटुंबीयांना पक्षात घेण्यासाठी भाजप नेते आणि विशेषत: पंकजा मुंडे यांचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, शरद पवारांनीच बीडमधल्या ६ विधानसभा उमेदवारांची नावं जाहीर केली होती, ज्यामध्ये नमिता मुंदडा यांचा देखील समावेश होता. मात्र, उमेदवारी मिळून देखील नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनाच भाजपची केजमधून उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -

उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही राष्ट्रवादीचा उल्लेखच नाही!

नमस्कारस्व.डॉ.सौ.विमलताई मुंदडा यांनी गेली २५ वर्ष लोकांच्या हितासाठी पुर्ण आयुष्य दिले, मतदारसंघातील प्रत्येकाशी…

Namita Akshay Mundada ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 21, 2019


हेही वाचा – काँग्रेसच्या ‘त्या’ आमदारांच्या भाजप प्रवेशाला पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील नाहीच!

संगीता ठोंबरेंचा पत्ता कट?

दरम्यान, नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता केजमधून भाजप त्यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान भाजप आमदार संगीता ठोंबरे यांचा पत्ता कट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत बिनसल्यामुळेच त्यांची उमेदवारी कापली गेल्याचं देखील सांगितलं जात आहे.

- Advertisement -

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नामोस्तुते।।घटस्थापना व नवरात्रोत्सव निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!Happy Ghatsthapana & Navratri to all.

Namita Akshay Mundada ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 28, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -