घरमहाराष्ट्रकरमाळ्यात घड्याळाचा नाही, सफरचंदाचा प्रचार करा; राष्ट्रवादीचे आदेश

करमाळ्यात घड्याळाचा नाही, सफरचंदाचा प्रचार करा; राष्ट्रवादीचे आदेश

Subscribe

आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मत न देता अपक्ष उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन करण्याची नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवली आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय कृष्णराव पाटील (घाटणेकर) यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी बीडमध्ये एका सभेत केज मतदारसंघासाठी नमिता मुंदडा यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षातून आश्चर्य व्यक्त केले गेले होते.

करमाळातून संजय कृष्णराव पाटील यांचा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षाच्यावतीने देण्यात आला. संजय यांना काही तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मागे घेता आला नाही. तो अर्ज तसाच आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसे पत्रक आज पक्षाच्यावतीने काढण्यात आले आहे. अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या सफरचंद चिन्हाचे काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सोलापूरमधील सभेत करमाळ्यातून संजय कृष्णराव पाटील यांच्याऐवजी संजय शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर संजय पाटील यांनी एक व्हिडिओ प्रसारीत करत अजित पवार यांच्यावर टीका केली होती. मी शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याला डावलण्याची किमंत अजित पवार यांना मोजावी लागले, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते.

संजय शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -