भाजपचे १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात – जयंत पाटील

राजकीय वर्तुळात भाजपाला गळती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai
ncp state president jayant patil says 15 to 20 mlas touch ncp

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता पक्षांतर करून गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपला गळती लागण्याचे चित्र तयार होताना दिसत आहेत. पुढे जयंत पाटील यांनी भाजपचे १५ ते २० आमदार संपर्कात असल्याचे सांगितले आहे.

ज्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये पक्षांतर केले होते. त्यापैकी काही नेते हे निवडणुकीत विजयी झाले असून अनेक नेते हे पराभूत झाले आहेत. तसंच पक्षांतर केलेल्या नेत्यांचे हेतू साध्य झाले नसल्याने तसंच भाजपमधून या नेत्यांना फारस महत्त्व देखील मिळत नसल्याचं दिसत आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पक्षांतर केलेले आणि आमदार झालेले जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे सध्या या भेटीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तसंच याप्रकारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी देखील चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे कदाचित भाजपला गळती लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – ‘एनडीए’तून शिवसेना बाहेर? संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य