घरमुंबईआईच्या प्रचारासाठी निखिलने लिहिले रॅपसाँंग

आईच्या प्रचारासाठी निखिलने लिहिले रॅपसाँंग

Subscribe

‘एक होती झासीच्या राणी’चाच भायखळ्यात बोलबोला

भायखळा विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उरलेल्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यासाठी त्यांचे पुत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रचार करत आहेत. विशेष म्हणजे आईसाठी त्याने स्वत:च गाणे लिहून संगीतबध्द केलेल आहे. त्यामुळे यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी बनवलेले हे रॅप साँग चांगलेच लोकांच्या पसंतीला उरताना दिसत असून यातील प्रत्येक शब्द आणि त्याचे चित्रण हे सर्वांनाच भुरळ पाडताना दिसत आहे.

त्यामुळे यामिनी जाधव यांच्या प्रचाराची एक बाजू सक्षमपणे निखिल आणि त्यांच्या टिमने उचलल्याने भायखळ्यात सध्या तरी प्रचारात एक होती झासीची राणी… आली आली भायखळ्याची यामिनीचाच बोलबाला आहे.

- Advertisement -

भायखळा विधानसभा मतदार संघातून एमआयएमचे उमेदवार,आमदार वारिस पठाण यांच्याविरोधात शिवसेनेच्या यामिनी जाधव निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. सुरुवातीपासूनच या मतदार संघातून शिवसेनेच्यावतीने निवडणूक लढणार असल्याने यामिनी जाधव यांनी तिकीट वाटप होण्यापूर्वीपासून मतदार संघाची बांधणी करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळेे आधीपासूनच प्रचारात बाजी घेणार्‍या यामिनी यांच्यावर चित्रित केलेले रॅप साँग हे सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

भायखळ्याची ही ताई, गरजुंना केली माया…अनाथांची ही आई…महाराष्ट्राची ही माती भायखळ्यातही भगवा वारा… असे शब्दबोल असलेले रॅपसाँग खुद्द यामिनी जाधव यांचे पुत्र आणि सिनेट सदस्य निखिलने रचलेले आहे. आईच्या प्रचारासाठी कॉमिक बुकाचे प्रकाशन करणार्‍या निखिलने रॅप साँगही बनवले आहे. त्यामुळे निखिलच्या या राजकीय गुणांबरोबरच कलाविष्कारामुळे भायखळ्यातील जनतेला प्रचारात वेगळा रंग पाहायला मिळाला आहे. आजच्या तरुणांना रॅपची आवड असल्यामुळे त्याप्रमाणे रॅप साँग तयार करण्यात आले आहे. निखिल आणि मित्र परिवारासह चित्रकलेचे शिक्षक व सर्व नातेवाईक हे यामिनीच्या प्रचारात झोकून देताना दिसत आहे. निखिलने आईसाठी हे रॅपसाँग बनवले असले तरी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवरही उत्तम शब्दबोल गाणे रचल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -