घरमुंबईस्मार्ट ठाण्याच्या वाहतूक पोलीस चौक्यांमध्ये भंगाराचे सामान

स्मार्ट ठाण्याच्या वाहतूक पोलीस चौक्यांमध्ये भंगाराचे सामान

Subscribe

स्मार्ट ठाण्याच्या वाहतूक पोलीसांच्या चौक्या शोभेपुरत्याच ठरल्या असून या चौक्यांमध्ये चक्क भंगार सामान ठेवण्यात आले आहे.

एकिकडे स्मार्ट ठाण्याच्या गप्पा रंगवल्या जात असतानाच दुसरीकडे मात्र, वाहतुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या वाहतूक पोलीसांच्या चौक्या शोभेपुरत्याच ठरल्या आहेत. पोलीस चौक्यांमध्ये चक्क भंगार सामान ठेवण्यात आले आहे. दक्ष नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधून दोन महिने उलटले मात्र, कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या तत्परतेविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

वाहतूक चौक्यांमध्ये भंगाराचे सामान

ठाण्यातील राम मारूती रेाड अलोक हॉटेल परिसरासह अन्य ठिकाणी वाहतूक पोलीस चौक्या उभ्या आहेत. नौपाडा परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या निवाऱ्यासाठी छोट्या चौक्या उभारण्यात आल्या पण या चौक्यांचा वापर होत नसल्याने त्या ओसाड पडल्या आहेत. सध्या वाहतूक चौक्यांमध्ये भंगाराचे सामान आहे तर राजकीय पक्षांनीही चौक्यांचा वापर नेत्यांचे बॅनर लावण्यासाठी केले जात आहे. त्यामुळे अनेक चौक्यांवर राजकीय पक्षांनी बॅनर लावलेले दिसून येतात. तसेच ऐन गर्दीच्या वेळी या चौक्या वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. ठाण्यातील माहिती अधिकारी कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी वाहतुकीसाठी अडगळीच्या ठरलेल्या आणि चौक्यांमध्ये भंगार सामान ठेवल्याचा पर्दाफाश केला आहे. यासंदर्भात मोने यांनी वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर पोलिसांनी वापरात नसलेल्या चौक्या लवकरात लवकर हटविण्याचे आश्वासन मेाने यांना दिले होते. मात्र, या आश्वासनाला दोन महिने उलटले मात्र, आजही चौक्या जैसे थेे आहेत. पोलिसांकडून कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त होत आहे. रिकाम्या पोलीस चौक्या नागरिकांमध्ये नैराश्य पसरवीत असून, करदात्या नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत आहे याकडेही मोने यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

कुठे आहेत या चौक्या

राम मारूती मार्ग
अलोक हॉटेलजवळ
विष्णुनगर गडकरी पथ


हेही वाचा – ‘सगळी वाट लाऊन झाली आणि आता रुग्णालयात दाखल’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -