घरमहाराष्ट्र'कभी मिर्ची का व्यापार, कभी मिर्ची के साथ व्यापार' मोदींची प्रफुल पटेलांवर...

‘कभी मिर्ची का व्यापार, कभी मिर्ची के साथ व्यापार’ मोदींची प्रफुल पटेलांवर टीका

Subscribe

आघाडी सरकारच्या काळात दहशतवादी हल्ला करणाऱ्या किंवा त्यांच्याशी संबंध असणाऱ्या लोकांना सोडून देण्यात येत होते. कधी कधी तर त्यांच्यासोबत व्यवसायही केला जायचा. ‘कभी मिर्ची का व्यापार, कभी मिर्ची के साथ व्यापार’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांद्रे येथील महायुतीच्या सभेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचे नाव न घेता टीका केली. आधीचे भ्रष्ट सरकार फक्त भ्रष्टाचाऱ्यांसाठी काम करत होते. मात्र फडणवीस यांच्या इमानदार सरकारने महाराष्ट्राच्या प्रगतीला गती दिली, असे सांगत मोदींनी पुन्हा एकदा महायुतीचे सरकार निवडून द्या, असे सांगितले..

वांद्रे येथे आज भाजप-शिवसेनेची एकत्रित सभा संपन्न झाली. या सभेला युतीमधील घटक पक्ष उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांवर हल्ला चढवत पुन्हा एकदा युतीला निवडून देण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

सध्या पीएमसी बँकेचा मुद्दा गाजत आहे. बँका अडचणीत आल्यामुळे विरोधकांनी भाजप सरकारवर दबाव वाढवला असतानाच आज मोदी यांनी पुन्हा एकदा हा विषय आधीच्या सरकारवरच टोलवला आहे. “आघाडी सरकारच्या दहा वर्षात काँग्रेसने भारताच्या बँकिग क्षेत्राला बर्बाद केले. त्यामुळेच आता कुणी तिहार, तर कुणी मुंबईच्या तुरुंगात आहे. अजूनतरी आमची साफसफाई बरीच बाकी आहे. सामान्य माणसाचा एकही रुपया वाया जाणार नाही,” असे आश्वासन मोदी यांनी दिले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -