भाजपच्या लोकांमुळे PMC बँक बुडाली – राज ठाकरे

Mumbai
Raj Thackeray Rally in Bandra East
राज ठाकरे

पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर (PMC Bank) रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्यानंतर एकच हाहाकार उडाला. पीएमसी बँकेवर निर्बंध टाकल्यामुळे लाखो सामान्य गुंतवणूकदारांना धक्का बसला होता. कर्जवाटपात अनियमितता झाल्यामुळे बँकेचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. ही बँक बुडण्यामागे भाजपच्या लोकांचा हात असल्याचा आरोप आज राज ठाकरे यांनी केला. वांद्रे पुर्व विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अखिल चित्रे यांच्या प्रचारासाठी त्यांनी जाहीर सभा घेतली होती. या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

राज ठाकरे म्हणाले की, “आज एकही माणूस समाधनी दिसत नाही. बँका बुडत आहे. खातेदार बँकेच्या बाहेर जाऊन रडत आहेत. खातेदारांच्या विनवण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आले. कुणाची लग्न होती, कुणाच्या काही अडचणी होत्या, मात्र त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळत नाहीत. नुकतीच पीएमसी बँक बुडाली. या बँकेच्या अधिकार पदावर भाजपचे लोक होते.”


हे वाचा – PMC बँक बुडविणाऱ्या वाधवान बंधूकडे ईडीला सापडले ‘घबाड’


पीएमसी बँकेने मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले मात्र त्याची वसुलीच न झाल्यामुळे बँकेवर आर्थिक संकट आले. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने बँकेवर आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लादले. पीएमसी बँकेने मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले मात्र त्याची वसुलीच न झाल्यामुळे बँकेवर आर्थिक संकट आले. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने बँकेवर आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लादले.

पीएमसी बँक ही सहकार क्षेत्रातील बँक असून त्याची एकत्रित भांडवल ११ हजार ६०० कोटी इतके आहे. पाच राज्यात बँकेच्या १३७ शाखा आहेत. कर्जवाटप घोटाळा बाहेर आल्यानंतर व्यवस्थापकिय संचालक जॉय थॉमस यांना निलंबित करण्यात आले आहे. बँकेने बांधकाम क्षेत्रातील एचडीआयएल कंपनीला नियमबाह्य पद्धतीने २५०० कोटींचे कर्ज दिले होते. मात्र ही रक्कम ६६०० कोटींपर्यंत असून शकते, असेही सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here