‘भाजप’साठी शिवसेनेचे दार बंद!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनवर पत्रकार परिषद घेत असून ते फडणवीसांच्या वक्तव्यावर काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. 

Mumbai
Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सध्या राज्यात सत्ता शिवसेनेची येणार की भाजपची? मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा? याचीच सगळ्यात जास्त चर्चा असताना आता राजकारण शेवटच्या टप्प्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना धोरणात्मक निर्णय होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री पद सांभाळण्यास सांगितले आहे. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच ‘आम्ही कोणताही अडीच – अडीच वर्षाचा निर्णय घेतला, नसल्याचे देखील सांगितले आहे. युती तुटली असं मी म्हणणार नाही. मात्र गैरसमज दूर झाल्यास पुन्हा महायुती सत्तेत येईल’, असे देखील ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनवर पत्रकार परिषद घेत असून ते फडणवीसांच्या वक्तव्यावर काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.