घरमहाराष्ट्र'शिवसेना महाआघाडीसोबत जाऊ नये, म्हणून भाजप प्रयत्नशील'

‘शिवसेना महाआघाडीसोबत जाऊ नये, म्हणून भाजप प्रयत्नशील’

Subscribe

'राज्यात शिवसेनेने महाआघाडीसोबत जाऊ नये, म्हणून भाजपचे प्रयत्न सुरु असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

‘राज्यात शिवसेनेने महाआघाडीसोबत जाऊ नये, म्हणून भाजपचे प्रयत्न सुरु असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यामांशी बोलताना दिली आहे. आधी भाजप, नंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील सत्तास्थापनेत अपयश आल्यानंतर अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आणि त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेची खलबतं सुरु झाल्याचे दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर ‘शिवसेनेसोबत आमची आघाडी होऊ नये’, म्हणून भाजपा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

‘शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांची चर्चा केली आहे. मात्र, शिवसेनेसोबत एनडीएचा एक घटक असल्यामुळे चर्चा होत नव्हती. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच आम्ही आमदारांशी चर्चा करुन त्यासंबंधी सोनिया गांधी यांना कळवले असून त्यांनी आम्हाला दिल्लीत बोलावले आणि त्यांच्यासोबत चर्चा ही झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, सत्ता स्थापनेबाबत शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मात्र, तोपर्यंत पाठिंब्याचे पत्र देण्यासाठी उशीर झाला होता. तसेच त्यांनी माध्यमांशी बोलताना देखील सांगितले होते की, सर्वप्रथम दोघांमध्ये चर्चा होईल आणि त्यांनतर पुढे जाऊ. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी सोनिया गांधींशी चर्चा केली आहे, असे देखील चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांच्या हट्टापायी आयारामांच्या हाती धुपाटणे!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -