राज ठाकरेंची पहिल्या सभेत मागणी, ‘मला सत्ता नको, विरोधी पक्षाची धुरा द्या’!

राज ठाकरेंची पहिलीच प्रचारसभा मुंबईत होत असून यासाठी त्यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघाची निवड केली आहे.

Mumbai
Raj Thackeray Speech at Bhandup Rally

पुण्यातली सभा रद्द झाल्यानंतर अखेर मुंबईत राज ठाकरें पहिली प्रचारसभा झाली. वांद्रे पूर्वमध्ये झालेल्या या पहिल्याच प्रचारसभेमध्ये राज ठाकरेंनी अवघ्या १७ मिनिटांमध्ये आपलं भाषण आटोपतं घेतलं. त्यांचं हे कदाचित सर्वात छोटं भाषण असल्याचं बोललं जात आहे. या भाषणामध्ये त्यांनी कोणताही व्हिडिओ लावला नाही किंवा सत्ताधारी आणि विरोधकांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका देखील केली नाही. त्यामुळे काही प्रमाणात स्थानिक मनसे कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं. ‘या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मी भूमिका घेतोय. पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या १८ ते १९ सभा आहेत. या विधानसभेला मी तुमच्यासमोर एक मागणं घालायला आलो आहे. ते म्हणजे, या राज्याला सर्वार्थाने ज्याची गरज आहे, ती एका कणखर, सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. सत्तेतला आमदार काही करू शकत नाही. विरोधी पक्षातला आमदार तुमच्या मनातली खदखद मांडू शकतो. विरोधी पक्षाचा नेता, आमदार आश्वासनांचा जाब विचारू शकतो. तो या सरकारला नामोहरम करू शकतो. जेव्हा माझ्या आवाक्यात सत्ता असेल, तेव्हा मी सत्तेसाठी तुमच्याकडे येईन. पण आज मी तुमच्याकडे विरोधी पक्षासाठी तुमच्याकडे आलोय. अशी कुणी मागणी केली असेल, असं मला वाटत नाही. म्हणून आज राज्याच्या नागरिकांची गरज आहे ती सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्यांची आहे. सत्ताधाऱ्यांच्या अंगावर जाणाऱ्यांची आहे’, असं यावेळी राज ठाकरे म्हणाले.


गोरेगाव सभेत राज ठाकरे म्हणतात, ‘ब्लू फिल्म काढली असती, तर लोकांनी पाहिली तरी असती’

वाचा राज ठाकरेंच्या १७ मिनिटांच्या भाषणातील सर्व मुद्दे!