गोरेगाव सभेत राज ठाकरे म्हणतात, ‘ब्लू फिल्म काढली असती, तर लोकांनी पाहिली तरी असती’

Mumbai
Raj Thackeray Rally in Bandra East
राज ठाकरे

वांद्रे पूर्वमध्ये जाहीर सभेमध्ये आपल्याला सत्ता नको असून विरोधी पक्षनेतेपद हवं असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केल्यानंतर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यानंतर तासाभरातच राज ठाकरेंची गोरेगावमध्ये जाहीर सभा झाली. त्यामध्ये त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. ‘मला ईडीने चौकशीला बोलावलं. चौकशी झाल्यानंतर बाहेर पडल्यावर पहिलं वाक्य सांगितलं माझं थोबाड थांबणार नाही. ज्याच्यात काही संबंधच नाही, तिथे निवडणुकांचं राजकारण करण्यासाठी चौकशा लावता. ज्यांना अशा धमक्या दिल्या, ते भाजपत गेले. मला, या अशा चौकशांचा काही फरक पडत नाही’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, आरेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘मला इथल्या न्यायालयांचं देखील कळत नाही. सरकारशी संगनमत करून कशा प्रकारे काम सुरू आहे हे दिसतंय. शुक्रवारी झाडं कापायचा निर्णय देता. शनिवार-रविवार सुट्ट्या असतात. या दोन दिवसांमध्ये सगळी झाडं छाटून टाकली. सरकारला याचा जाब विचारायला कुणी नाही, म्हणून हे असं घडतं. याआधीच्या सरकारमध्ये पर्यावरणमंत्री कुणाचा होता? रामदास कदम हे शिवसेनेचे पर्यावरणमंत्री होते. ते ही झाडांची कत्तल थांबवू शकले नाहीत का? आणि आता शिवसेनेचे पक्षप्रमुख सांगतात, सरकार हाती दिल्यावर आरेला जंगल घोषित करू. आम्हाला मूर्ख समजलात का?’, असं देखील राज ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here