घरमुंबईठरलं, मनसे निवडणूक लढवणार! राज ठाकरेंनी केली पहिल्या उमेदवाराची घोषणा

ठरलं, मनसे निवडणूक लढवणार! राज ठाकरेंनी केली पहिल्या उमेदवाराची घोषणा

Subscribe

आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही? यावर मनसेमध्ये बरीच चर्चा सुरू असून अखेर राज ठाकरेंनी मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मेळाव्यामध्ये यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली.

शरद पवारांच्या ईडी नाट्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर कम्पाऊंड घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी झाली होती. त्यानंतर पुढे का होणार? मनसे निवडणूक लढवणार का? ईडीच्या चौकशीमुळेच राज ठाकरे विधानसभेसाठी इच्छुक नाहीत का? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, यावर राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा भूमिका मांडला जात नव्हती. अखेर, सोमवारी झालेल्या मनसे मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी पक्षाची या सगळ्या प्रकारावर ईडीच्या चौकशी नाट्यानंतर पहिल्यांदाच भूमिका मांडली. मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये झालेल्या मनसे इच्छुक उमेदवारांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी उमेदवार आणि मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला! यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. तसेच दररोज काही नावं जाहीर करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, येत्या ५ तारखेपासून प्रचाराला सुरुवात करणार असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले.

धर्मा पाटलांचा मुलगा मनसेचा पहिला उमेदवार!

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी मनसेकडून उभ्या राहणाऱ्या काही उमेदवारांची नावं देखील जाहीर केली. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे मंत्रालयात आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांचं. नरेंद्र पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश घेतला असून ते या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी जाहीर केलं. त्यासोबतच, नाशिकमधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी देखील आज मनसेमध्ये प्रवेश केला असून ते देखील मनसेकडून निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – निवडणूक आयोगाचे स्वस्त दरपत्रक; व्हेज थाळी १२० तर मटण थाळी १५० रुपये

‘हळूहळू सगळं सांगेन’

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी, ‘आजपर्यंत जे काही नाही बोललो, ते सगळं येत्या ५ तारखेपासून सुरू होणाऱ्या प्रचारादरम्यान बोलेन’, असं सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकांदरम्यान ‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईलमध्ये प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीत कोणता अवतार पाहायला मिळणार आहे, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे.

एक प्रतिक्रिया

  1. शेतकरी धर्मा पाटीलांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या चिरंजीवांना निवडून देतील का ?? कि गाजर सरकार ??

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -