‘राजीनाम्याचा परिणाम पक्ष प्रमुखांवर होत नाही, तर राजीनामा देणाऱ्यांवर होतो’

राजीनामाचा परिणाम पक्ष प्रमुखांवर होत नाही तर राजीनामा देणाऱ्यांवर होईल, असा सज्जड दमच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पूर्व विधानसभेतील शिवसेनेने बंडखोरी केलेल्यांना भरला आहे.

Mumbai
Eknath Shinde
एकनाथ शिंदे

कल्याण पूर्व विधानसभेतील शिवसेनेने बंडखोरी केली आहे. बुधवारी सेनेच्या २८ नगरसेवकांनी पक्ष प्रमुखांकडे राजीनामे दिले आहेत. मात्र, राजीनामाचा परिणाम पक्ष प्रमुखांवर होत नाही तर राजीनामा देणाऱ्यांवर होईल, असा सज्जड दमच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कल्याणात दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बंडखोरांवर कारवाई करतील असेही शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

बंडखोर नगरसेवकांना पालकमंत्र्यांच्या इशारा

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पालक मंत्री एकनाथ शिंदे खासदार कपिल पाटील आणि सेना बीजेपी आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या नगरसेवक संदर्भात भाष्य करताना एकनाथ शिंदे यांनी बंडखोर नगरसेवकांना स्पष्ट इशारा दिला आहे. ‘राजीनाम्याचा पक्षावर परिणाम होणार नाही, बेशिस्तपणे वागतील त्याचा योग्य तो समाचार पक्ष प्रमुख घेतील. महापालिका निवडणुका जवळच आहे. त्याबाबतही निर्णय होईल. मात्र, बंडखोरीला थारा नाही, असे शिंदे यांनी खडेबोल सुनावले आहेत.


हेही वाचा – अभिजीत बिचुकलेंना निवडणुक आयोगाचा दणका