घरमुंबईपनवेलमध्ये ‘एकच वादा प्रशांतदादा’

पनवेलमध्ये ‘एकच वादा प्रशांतदादा’

Subscribe

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीला भरपावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल विधानसभा मतदार संघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ आज (शनिवार, दि. १९) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी खारघरमध्ये भरपावसातही झालेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे यामध्ये युवकांसोबत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सेक्टर २१ मधील सचिन तेंडुलकर मैदानाजवळ रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत नगरसेवक, नगरसेविका, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, शंकरशेठ ठाकूर, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ’एकच वादा प्रशांतदादा’ घोषणेने आसमंत दणाणून गेले. यावेळी जागोजागी औंक्षण होत होते तसेच नागरिक प्रतिसाद दर्शवित होते. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली कामे पनवेलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची ठरली, त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव राज्यभरात झाला.

- Advertisement -

पतंप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूकमधील असले तरी त्याचा गर्व त्यांनी केला नाही, त्यामुळे सर्व पनवेलकरांना त्यांचा नेहमीच अभिमान असल्याचे दिसत आहे. आमदार प्रशांत ठाकूर सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे व्यक्तीमत्व आणि दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जात पंत धर्म पंथ न मानता माणुसकी हाच एक धर्म मानणारे असल्याने त्यांना सर्व समाजातील लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. आजपर्यंत झालेल्या झंझावाती प्रचारातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोठी आघाडी घेतली आहे, त्यामुळे विजयाची हॅट्रिक एक लाखाच्या मताधिक्याने होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -