घरमुंबईउल्हासनगरमध्ये रिपाइंचा पेच कायम!

उल्हासनगरमध्ये रिपाइंचा पेच कायम!

Subscribe

उल्हासनगर विधानसभा १४१ मधील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांना आज रिपाई (आठवले गट) जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्याची घोषणा केली आहे. मात्र, दुसरीकडे अपक्ष उमेदवार भगवान भालेराव यांनी भाजपला पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे असे कोणतेही पाठिंबा दिल्याचे अधिकृत पत्र नसल्याचा दावा केला आहे. भाजपा-शिवसेना-रिपाइं महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर रिपाइं गटाचे जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भालेराव हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने मतांचे विभाजन होऊ शकते आणि महायुतीमध्ये रिपाइं पक्ष असल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांना पाठिंबा दिल्याचा दावा उपस्थित रिपाइं पदाधिकाऱ्यांनी केला.

पाठिंबा दिल्याचं अधिकृत पत्रच नाही!

शहीद अरुणकुमार वैद्य सभागृहात रिपाइं जिल्हा कार्यकारणी पदाधिकऱ्यांनी महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांना पाठिंबा जाहीर केला. यासंदर्भात भगवान भालेराव यांना विचारले असता ते म्हणाले की रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप उमेदवार कुमार आयलानी यांना पाठिंबा दिल्याचे पत्र अधिकृत नाही. ज्या पदाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली त्यापैकी केवळ एकच पदाधिकारी अधिकृत असून इतर कोणीही अधिकृत पदाधिकारी नाही. मी अपक्ष असलो तरी रिपाइंचे मला समर्थन आहे. अजूनही मी रिपाइंचा पदाधिकारी असून ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे त्यांची तक्रार मी आठवले साहेबांना केली असून कारवाईची मागणी देखील केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -