घरमुंबईराष्ट्रवादीला आणखी एक धक्का; संजय दीना पाटील यांचा सेनेत प्रवेश

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; संजय दीना पाटील यांचा सेनेत प्रवेश

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेता शिवसेनेच्या वाटेवर जात असल्याचे सांगितले जात आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघाचे लोकसभेसाठीचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी खासदार संजय दीना पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. असे झाल्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का लागणार आहे. जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसतशी राज्यात आघाडीला धक्के बसत जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी तसेच आमदारांनी भाजप – शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आज, शुक्रवारी आणखी एक माजी खासदार शिवसेनेत प्रवेश करत आहे. संजय दीना पाटील हे सायंकाळी ५ वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीतून यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेत गेलेल्या नेत्यांची यादी काही कमी नाही. यापूर्वी राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा, सचिन अहिर, जयदत्त क्षीरसागर, रश्मी बागल, दिपील सोपल या दिग्गजांनी सेनेत प्रवेश केला आहे. आता संजय दीना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश होत आहे. हा राष्ट्रवादीला किंबहुना शरद पवारांना मोठा धक्का असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

भाजपचा नवा ट्वीस्ट! चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्नीला दिली उमेदवारी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -