घरमहाराष्ट्र'एनडीए'तून शिवसेना बाहेर? संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य

‘एनडीए’तून शिवसेना बाहेर? संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठे वक्तव्य केले. एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकताच बाकी आहे, असे राऊत म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद टोकाला गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर निघाली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, त्याबाबत शिवसेनेकडून अद्यापही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकताच बाकी आहे, असे राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेना एनडीएतून फारकत घेणार हे निश्चित झाले आहे.


हेही वाचा – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिष्टमंडळाची राज्यपाल भेट तूर्तास स्थगित

- Advertisement -

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला गेला म्हणून आम्ही एनडीएपासून दूर गेलो आहोत, असे संजय राऊत म्हणाले. त्यावेळी राऊत यांना शिवसेना बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे का? असा प्रश्न विचारला असता असं म्हणायला काहीही हरकत नाही, असे राऊत म्हणाले. त्याचबरोबर ‘महाराष्ट्रात जो सत्ता पेच निर्माण झाला त्यानंतर शिवसेनेच्या केंद्रातल्या मंत्र्याने राजीनामा दिला तो अशासाठी दिला की लोकांचा आमच्यावरुन विश्वास उडू नये. एनडीएच्या स्थापनेत बाळासाहेब ठाकरे, अकाली दल यांचाही मोठा सहभाग होता. आता जे सुत्रधार आहेत ते त्यावेळी नव्हते’, असे देखील संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -