Live : राज्यपालांचे शिवसेनेला सरकार स्थापनेचे आमंत्रण

uddhav thackeray
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत

भाजप, शिवसेना, रासप, रिपाई यांच्या महायुतीला जनतेने भरघोस जनादेश दिला. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला नव्याचे राज्यात सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. विधानसभा निवडणुकीत जनादेश महायुतीला मिळाला. पंरतू शिवसेनेने जनादेशाचा अनादर करत महायुतीसोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे सध्या भाजप सरकार स्थापन करू शकत नाही. शिवसेनेला राष्ट्रवादी, काँग्रेससोबत येऊ सत्ता स्थापन करायची असल्याची ते करू शकतात. सरकार स्थापन करण्यास भाजप असमर्थ आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी राजभवनात राज्यपालांशी भेट घेतल्यानंतर दिली. तसेच थोड्याच वेळात काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.