Friday, August 7, 2020
Mumbai
29.8 C
घर महामुंबई सत्ता आल्यानंतर भाजपवाल्यांसाठी वेड्यांची इस्पितळं काढू – संजय राऊत

सत्ता आल्यानंतर भाजपवाल्यांसाठी वेड्यांची इस्पितळं काढू – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. तसेच, बहुमताच्या दिवशी आमचा आकडा त्यांच्यापेक्षा (भाजप) १० ने जास्त असेल, असं देखील ते म्हणाले.

Mumbai
shiv sena mp sanjay raut
शिवसेना नेते संजय राऊत

‘हातात सत्ता नसेल, तर भाजपचे लोकं वेडे होतील. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आमच्या आरोग्यमंत्र्यांना काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वेड्यांच्या इस्पितळांची निर्मिती करायला सांगू. कारण त्यांना हा पराभव पचणार नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडू शकते’, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. सोमवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपवर टीका केली. त्यासोबतच, ‘तुमच्याकडे बहुमत होतं हे तुम्ही राज्यपालांना मध्यरात्री दाखवलं. नंतर शपथ घेतली. तुमच्याकडे बहुमत होतं, तर हे असले प्रकार करण्याची गरज काय? यात तुम्ही राज्यपालांची, राष्ट्रपतींची आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली’, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

‘हरियाणातल्या हॉटेलमध्ये रेस्क्यू ऑपरेशन!’

यावेळी संजय राऊत यांनी हरियाणामधून सोडवून आणलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविषयी देखील सांगितलं. ‘गुडगावच्या एका हॉटेलमध्ये ११७ रुम नंबरमध्ये राष्ट्रवादीच्या त्या ३ आमदारांना ठेवण्यात आलं होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं. तिथे या आमदारांना कोंडून ठेवलं होतं. त्यांच्यासाठी हरयाणाचे पोलीस आणि गुंड लोकं ठेवले होते. हे लोकशाहीला हितकारक नाही’, असं संजय राऊत म्हणाले.

‘आमचा आकडा १० ने जास्त असणार’

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी, ‘विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी आमचा आकडा १० ने जास्त असणार’ असा विश्वास यावेळी व्यक्त केला. ‘भाजप आणि अजित पवारांनी जो पायंडा पाडला, तो यशवंतराव चव्हाणांच्या कार्याला मारक आहे. तुम्ही कितीही घोटाळे करा, पण विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आमचा आकडा तुमच्यापेक्षा १०ने जास्त असेल’, असं यावेळी संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – अजून ३ आमदार राष्ट्रवादीकडे परतले, अजित पवारांकडे आता एकच आमदार