घरफिचर्सये ‘बंधन’ तो....

ये ‘बंधन’ तो….

Subscribe

दादासाहेब सकाळपासून चिंतेत दिसत होते.त्यांची नुसती शोधाशोध सुरू होती.निवडणुकीच्या दोन तीन आधी जय हिंद पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे दादासाहेब धर्मनिरपेक्ष असलेल्या देशहितवादी पक्षात आले होते.पण,सकाळपासूनच ते चिंतेत दिसत होते.पहाटेपासूनच एक्झिट पोलवाले जागे झाले होते,आणि त्यांनी दादा साहेबांची झोप उडवली होती.त्यात जय हिंद आणि सबका विकास पक्षाची युती झाल्याने दादासाहेब अजूनही चिंतेत होते.काय हो ,असे शोधताय काय? पत्नीने काळजीने विचारलं.दादासाहेबांना देखील पत्नीला कोणत्या तोंडाने सांगावं,काय कळत नव्हता,पण राजकारणात आल्यापासून तेवढा कोडगेपणा त्यांच्यात आला होता.अगं…..तो पक्षाच्या बंधनाचा लाल धागा कुठायं? दादा साहेबांनी पत्नीला सवाल केला.

अहो! नाव नका काढू त्या धाग्याचं आणि त्यात लाल बंधनाचं. गेले चार महिने एकनिष्ठतेने काम केल्यावर देखील त्यांनी तुम्हाला डावललं आणि आता कशाला हवायं तो धागा आणि ते बंधन नको आता आता आपल्या हातावर घड्याळच शोभून दिसतं,पत्नी जरा रागातचं म्हणाली.अग तू गप्प बस तुला काय कळत राजकारणातलं? घड्याळाचा टाईम काही चांगला नाही असे ते एक्झिट पोल वाले दाखवत आहेत,दादासाहेब जरा वैतागतच म्हणाले.हो मला कसं कळणार राजकारण? गेल्या दोन वर्षांत चार वेळा ते लाल बंधन काढून ठेवलय,तुम्ही. एव्हाना ते सर्व धागे मिळून एक मोठा दोरखंड तयार होईल,आणि असा कोणताही दोरखंड राजकारणात तुम्हाला बांधून ठेवील असे वाटत नाही,दादासाहेबांच्या पत्नीने खोचक टोला लगावला.अगं ते जाऊदे तुला माहित आहे ना? विरोध करणे हा आपला पिंडच नाही मुळात,कोणाला विरोधी पक्षात बसायचंय? गेल्या कित्येक वर्षांत सत्ताधारी पक्षात राहण्याची कसरत मी करत आलोय.

- Advertisement -

ही कसरत फळाला देखील आली आहे.आणि सत्तेचं बळ हातात असल्यावर कशाची चिंता,मग हातात घड्याळ असो किंवा लाल बंधन काय फरक पडतोय? दादासाहेबांनी पत्नीला रूबाबात उत्तर दिले.पत्नीने देखील युतीतील मित्रपक्षांसारखी फक्त मान डोलावली.ते जाऊदे तो धागा शोध, पुन्हा आपल्याला हिंद सेनेसाठी काम करावं लागेल,आणि हो तो दोन महिन्यासांठी लावलेला सायबांचा फोटो काढ आता आता दुसर्‍या सायबांचा फोटो लावावा लागेल,साहेबांनी पत्नीला आदेश दिला.तेवढ्यात सायबांचा कार्यकर्ता धावत आला,काय रे असा धापा का टाकतोयसं? दादासाहेबांनी प्रश्न विचारला.

अहो बंगल्यावरून सायबांचं बोलवणं आलंय,तुम्ही नाराज असल्याचं समजलं त्यांना ते तर लाल बंधन घेऊन आपल्या स्वागतासाठी तयारच आहेत.दादासाहेब पण आनंदले,कोणत्याही कटकटीशिवाय आणि लांगुलचालनाशिवाय त्यांना आता नवं लाल बंधन मिळणार आहे,याच खुशीत ते होते.दादा साहेब किती को होईना पण निदान हजार मतं तरी जमवू शकतील ,याचा पक्षश्रेष्ठींना अंदाज होता आणि काही इंचाच्या धाग्यात त्यांना ते परवडणारे देखील होते.

- Advertisement -

( राजकारणात खुर्ची आणि सत्तेच्या खेळात कोणतीही बंधन नसतात.जसा काळ बदलतो तसंतशी ही बंधनं कधी घट्ट तर कधी सैल करायची असतात हे दादासाहेबांनी ओळखले होते.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -